औरंगाबाद- निश्चित दरापेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थ विकणाऱ्या रेल्वेपन्ट्री कर्मचाऱ्यांना खरेदी पावती मगिल्यावरून रेल्वे स्थानकावर मनसे पदाधिकाऱ्यांनी राडा केला. या प्रकरणी मनसेच्या ५ पदाधिकाऱ्यां सह खाद्यपदार्थ विकणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी शहरातील सुभेदारी विश्रामगृह येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीसाठी परभणी येथून सचखंड एक्सप्रेस मधून जिल्हा अध्यक्ष रुपेश देशमुख, सचिन पाटील,अर्जुन टाक, उत्तमराव चव्हाण,अनिल भुसाळे,गोविंद ठाकर हे पदाधिकारी येत असताना, जालना जवळ आल्यावर रेल्वेतील खाद्यपदार्थ विक्रेत्या कडून पाण्याची बाटली घेण्यात आली मात्र ती बाटली ३० रुपयात देत असल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी चढ्या भावाने विक्रीला विरोध केला. व बाटलीच्या विक्रीची पावती देण्याचा आग्रह धरला. या वरून विक्रेते आणि मनसे पदाधिकारी मध्ये वाद झाला. रेल्वेतील सह प्रवासी देखील पदाधिकाऱ्यांच्या बाजूने होते. ६० ते ७० प्रवासी रेल्वेच्या पेंट्रीकार मध्ये गेले. व तेथे तक्रार बुक मागितली मात्र एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी आलेले पाहून कर्मचाऱ्यांनी तक्रार बुक दिली नाही या वरून पुन्हा वाद झाला. ही बाब औरंगाबाद येथील मनसे पदाधिकाऱ्यांना माहित होताच मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर, विपीन नाईक यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानक गाठले. दरम्यान जास्त दराने खाद्यपदार्थ विकणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. या प्रकरणी विक्रेते आणि पदाधिकारी यांनी परस्पर विरोधी तक्रार दिल्याने दोन्ही कडील प्रत्येकी पाच जणांविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करू..
रेल्वे मध्ये व प्लॅटफॉर्म वर खाद्यपदार्थ व पाण्याची बाटली चढ्या दराने विकली जात आहे .संबंधित कंत्राटदार व विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यांनी अन्यथा मनसेच्या वतीने त्रिव आंदोलन छेडण्यात येईल.
- सचिन पाटील
(मनसे पदाधिकारी, परभणी)
प्रवाशांची लूट थांबवा अन्यथा खळ-खट्याक
सर्रासपणे चढ्या भावाने खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. प्रवाशांची खुली लूट सुरू आहे. प्रशासनाच्या आशीर्वादा शिवाय हे शक्य नाही .येत्या सात दिवसात रेल्वेस्थंकावरील लूट बंद होऊन नियमानुसार खाद्यपदार्थ विक्री झाली नाही. तर मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल त्यानंतर उदभवणार्या परिस्तिथीची सर्वशी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील
सुमित खांबेकर,
जिल्हा अध्यक्ष, मनसे, औरंगाबाद.